

ATS Raids in Pune
esakal
कोंढवा आणि मुंब्रा येथे एटीएसची एकाचवेळी छापेमारी
दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात, ही कारवाई जुबेर हंगरगेकर प्रकरणाशी संबंधित
दिल्ली बॉम्बस्फोटाशी जुबेरचा संबंध नसल्याची प्राथमिक माहिती
जम्मू-काश्मीर, फरीदाबाद आणि दिल्ली प्रकरणांचे महाराष्ट्राशी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न.
Dlehi Blast Pune ATS Raid : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) अलर्ट झाले असून, कोंढवा आणि मुंब्रा परिसरात मंगळवारी छापेमारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याचा संबंध दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील प्रकरणाशी आहे का, याचीही एटीएसकडून चौकशी सुरू आहे.