

Summary
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी भीषण स्फोट झाला ज्यात १२-१३ लोकांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी हा आत्मघातकी (फिदायीन) हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
स्फोटापूर्वीच्या CCTV फुटेजमध्ये काळा मास्क घातलेला दहशतवादी उमर आय-२० कार चालवत असल्याचा संशय आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भीषण स्फोट झाला,यात किमान १२ ते १३ लोक ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत.हा आत्मघातकी हल्ला असल्याचे मानले जात आहे, दिल्ली पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. दरम्यान स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये ट्रॅफिकमधून एक आय-२० कार जात असल्याचे दिसून आले आहे. कारमध्ये काळा मास्क घातलेला व्यक्ती दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचे मानले जात आहे. हे फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते.