

Delhi Blast Video Goes Viral Man Talks About Terrorism Before Explosion
Esakal
दिल्ली स्फोटानंतर आता अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोमवारी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झालाय तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्फोटा घडला तेव्हाचे काही व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत. यात एका भाजप समर्थकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार देशात आहे आणि आता दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं जातं असं म्हटलंय. स्फोटाच्या आधी समर्थक असं बोलत असतानाच अचानक कारचा स्फोट झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.