

Delhi Building Roof Collapse
Esakal
दिल्लीतील शाहदरा इथल्या ज्वाला नगर परिसरात दोन मजली इमारतीचे छत कोसळल्याची घटना घडलीय. यात एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झालाय तर चौघे जखमी झाल्याचं समोर आलं आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिकांकडून बचावकार्य राबवलं जात आहे.