

Delhi Blash Video
ESakal
नवी दिल्ली : दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्याची मोठी घटना घडली आहे. लाल किल्लाजवळील मेट्रो स्टेशनजवळ एका गाडीत हा स्फोट झाला असून यामध्ये आतापर्यंत ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या स्फोटामुळे आग लागली आणि जवळील तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले.