Delhi Blast Pulwama Connection Revealed
esakal
दिल्लीत सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाची घटना घडली. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आय २० कारमध्ये हा स्फोट झाला. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाचे म्हणजे या स्फोटाचा तपास आता दहशतवादी हल्ला म्हणून केला जाणार आहे. त्यादृष्टीने एनआयएने तपासही सुरु केला आहे. यादरम्यानचं या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन पुढं आलं आहे.