esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

राहूल गांधी

चीनला लाल डोळे का दाखवत नाहीत : राहूल गांधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लडाख सीमेवरून चीनने सैन्यमाघारीस नकार दिल्याने वाढलेल्या तणावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला, मिस्टर ५६, चीनला लाल डोळे का दाखवत नाहीत, असा खोचक सवाल केला. भारतीय हद्दीत कोणीही आले नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १९ जून २०२० च्या बेजबाबदार वक्तव्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

भारत आणि चीनदरम्यान चर्चेची १३ वी फेरी निष्फळ ठरली. भारताचा प्रस्ताव चीनने अमान्य केला, तर भारताच्या मागण्या अवाजवी असल्याचे चीनने म्हटले आहे. या आरोप प्रत्यारोपांनंतर देशातील राजकारणही तापले आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही टीका केली. ते म्हणाले की, मोदींना देशाच्या सार्वभौमत्वाऐवजी आपली कृत्रिम प्रतिमा महत्त्वाची वाटत असल्याचे चीनच्या लक्षात आले आहे. म्हणून ही परिस्थिती ओढविली असून याला मोदीच जबाबदार आहेत.

भारतीय सैन्याने दक्षिण पॅंगाँग भागात चीनविरोधात निर्णायक आघाडी घेतली असताना ती का गमावली, असा सवालही खेडा यांनी केला. वीर देश, वीर सेना आणि दुबळे पंतप्रधान अशी परिस्थिती असल्यामुळेच चीनी सैन्य उत्तराखंड, अरुणाचल सीमेमध्ये घुसखोरी करू शकल्याचा आरोपही त्यांनी केला.

loading image
go to top