

Delhi CJP Protest At jantar Mantar
Esakal
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीकडून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू झालं आहे. पोलिसांचा फौजफाटा दिल्लीत तैनात करण्यात आला आहे. जंतर-मंतरवर येणाऱ्या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त असून आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीत येणाऱ्या २५० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर ४५ मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. शुक्रवारी रात्रीपासूनच दिल्लीत येणारी रेल्वेसेवा आणि रस्ते मार्ग ठप्प आहेत.