

Delhi CJP Protest: Contempt Petition Filed in Supreme Court
Esakal
दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक मेट्रो स्टेशन्स बंद ठेवली आहेत. तर रेल्वे गाड्याही रद्द केल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही मेट्रो स्टेशन्स आणि रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आता यावरून सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करू नये, तर आवश्यकतेनुसार तिचे नियमन करावे असे निर्देश दिले होते.