Arvind Kejriwal : केजरीवालांना आणखी सात दिवसांच्या कोठडीची ईडीकडून मागणी; आजची सुनावणी पूर्ण

Arvind Kejriwal Updates : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात कथित आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने कोर्टात केली आहे. केजरीवाल यांच्या आधीच्या ईडी कोठडीची मुदत गुरुवारी संपली आहे.
Arvind kejriwal
Arvind kejriwalesakal

Arvind Kejriwal Updates : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात कथित आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने कोर्टात केली आहे. केजरीवाल यांच्या आधीच्या ईडी कोठडीची मुदत गुरुवारी संपली आहे.

दरम्यान, दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाक दाखल करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवालांना दिलासा मिळाला आहे.

Arvind kejriwal
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली! विद्यमान खासदाराला डावलून आमदाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

दुसरीकडे गुरुवारी केजरीवालांच्या कोठडीवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. ईडीने कोर्टाकडे आणखी सात दिवसांची कोठडी मागितली आहे. कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र कोर्टाने आपला निकाल राखून ठेवलाय. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती बुधवारी बाहेर आली होती. ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com