मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट; भेटीनंतर म्हणाले...

Delhi CM Arvind Kejriwal Meets Home Minister Amit Shah
Delhi CM Arvind Kejriwal Meets Home Minister Amit Shah

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (ता.१९) दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शहा यांच्यासोबत चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे यावेळी केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल म्हणाले, 'दिल्लीशी संबंधित विविध विषयांवर अमित शहा यांच्याशी चर्चा केली. दिल्लीच्या विकासाठी एकत्र काम करण्यावर आमचे एकमत झाले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्ली निवडणुकीच्याआधी ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली होती. शाह यांच्या कार्यालयाने त्यावेळी भेटीची वेळ नाकारली होती. मात्र, त्यानंतर शहा आणि केजरीवाल यांची आज भेट झाली. अमित शाह यांच्याकडे भाजपच्या दिल्लीच्या प्रचाराची धुरा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com