Rain in North India: यमुना नदीच्या पाणी पातळीत रेकॉर्डब्रेक वाढ! केजरीवालांची मदतीसाठी केंद्राकडं धाव

गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातून लोकांना काढावा लागतोय मार्ग, सोसायट्यांमध्ये बोटींतून होतोय प्रवास
Yamuna river
Yamuna river

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या प्रलयकारी पाऊस सुरु असून युमना नदीच्या पाणी पातळीत रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक वाढ झाली आहे. सध्या या नदीची पाणी पातळी पहिल्यांदाच २०७.५५ मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडं मदतीसाठी धाव घेतली असून केंद्रानं या प्रश्नाकडं लक्ष घालावं अशी विनंती त्यांनी केली आहे. (Delhi CM Arvind Kejriwal urges Centre to intervene as Yamuna breaches all time record to swell)

नागरिकांची अवस्था कशी?

यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, यामध्ये अनेक भाग अक्षरशः बुडून गेले आहेत. या भागांमध्ये लहान मुलं गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातून दुकानातून दूध इतर वस्तू आणतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर गल्ल्या-गल्यांमध्ये लोक या पाण्यात पोहोताना दिसत आहेत. काही रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्यानं लोक अक्षरशः छोट्या होड्यांतून प्रवास करत आहेत. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी डोक्यावरुन मोठ्या प्रमाणावर सामान वाहतूक करताना दिसत आहेत.

Yamuna river
Maharashtra Politics: खाते वाटपाचा तिढा कायम! फडणवीस दिल्लीला रवाना, अजितदादाही जाणार

४५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

दरम्यान, हवामाना खात्यानं इथं १४ ते १६ जुलै दरम्यान आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळं पुराचा धोका आणखी वाढू शकतो. यमुना नदीची पाणी पातळी आज सकाळी ९ वाजता २०७.३२ मीटर इतकी नोंदवली गेली. ही पातळी दुपारी एक वाजता वाढून २०७.५५ मीटरवर पोहोचली. सकाळी झालेली नोंद हा यमुना नदीच्या पाणीपातळीचा १० वर्षातील रेकॉर्ड आहे. त्यानतंर दुपारच्या पातळीनं तर ४५ वर्षातला रेकॉर्ड मोडला आहे. ६ सप्टेंबर १९७८ रोजी दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी प्रचंड २०७.४९ मीटर इतकी नोंदवण्यात आली होती.

Yamuna river
Viral Video: मुलीची छेडछाड अन् पोलिसावर दादागिरी; तरुणाची झाली भर रस्त्यात धुलाई!

यामुळं यमुना नदीची पाणी पातळी वाढली

हरयाणाच्या यमुनानगरमधील हाथिनीकुंड बैराज इथून सातत्यानं पाणी सोडण्यात येत असल्यानं यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी या धरणातून सकाळी ९ वाजता १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आलं. तर मंगळवारी रात्री ७ वाजताना २ लाख ४२ क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com