'लसीकरणाच्या प्रक्रियेतील कडक निर्बंध शिथिल करा'; केजरीवालांचं PM मोदींना पत्र

Kejriwal
Kejriwal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसहित देशभरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावरील सर्व प्रकारच्या अटी शर्थी हटवण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण केंद्र उघडण्याच्या अटींमध्ये सूट तसेच लसीकरणासाठीच्या वयाची मर्यादा देखील हटवण्याची मागणी केली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना लसीकरण अभियानाला आणखी गती देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे. दिल्लीमध्ये दररोज तीन ते चार हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. केजरीवालांनी पत्रात लिहलंय की, जर लसीकरण केंद्र उघडण्याच्या नियमांमध्ये सूट दिली गेली तर दिल्ली सरकार सर्व दिल्लीवासीयांना तीन महिन्यांच्या आतच लस देऊ शकते. कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी प्रत्येक ठिकाणी केंद्र सरकारची मदत मिळाली आहे. मी अशी आशा करतो की, आपण या मागण्यांच्या विचार कराल, जेणेकरुन कोरोनाविरोधातील लढाई आणखी ताकदीने लढता येईल. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, भारताने आपल्या वैज्ञानिकांच्या प्रतिभेच्या जोरावर कमी काळात एक प्रभावशाली लस तयार करण्यात निर्णायक यश प्राप्त केलं आहे. 

यामुळे संपूर्ण जगभरात आपलं कौतुक देखील होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. लसीकरण अभियानाच्या दरम्यान संक्रमण याप्रकारे आणखी गतीने वाढत असल्याने आपल्याला लसीकरणाचे अभियान आणखी गतीने वाढवण्याची गरज आहे. यासाठी दोन स्तरांवर काम करण्याची गरज आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. एक म्हणजे लसीकरण केंद्रांची संख्या तातडीने वाढवण्याची आवश्यकता आहे. तर लसीकरण केंद्रांसाठी केंद्र सरकारने अनेक प्रकारचे कठीण नियम आणि अटी जाहीर केल्या आहेत, ज्यांमध्ये आता सूट देण्याची गरज आहे. 

केंद्र सरकारच्या नियमांनुसार, लसीकरण केंद्र फक्त हॉस्पिटल्स अथवा डिस्पेंसरीमध्येच होऊ शकतं. कारण लसीची काही रिऍक्शन आली तर लागलीच तिथेच उपचार करता यावा. मात्र गेल्या तीन महिन्यात लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अटीला काढून टाकण्यात यावं. आणि शाळा, सामुदायिक ठिकाणे आणि अन्य ठिकाणी मोठ्या स्तरावर लसीकरण केंद्रं बनवता येतील. या प्रक्रियेत खबरदारी बाळगणे आवश्यक राहिलच, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com