केजरीवाल यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक; OLX जाहिरात पडली महागात

टीम ई सकाळ
Monday, 8 February 2021

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिची ओएलएक्सवरील जाहिरातीच्या माध्यामातून फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिची ओएलएक्सवरील जाहिरातीच्या माध्यामातून फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. जुनं साहित्य विकण्यासाठी ओएलएक्सवर टाकण्यात आलेल्या एका जाहिरातीची माहिती घेण्याबाबत सांगत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

फसवणूक करणाऱ्यांनी हर्षिताचे 34 हजार रुपये उडवले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिताने जुना सोफा विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. त्यावरून तिला संपर्क करण्यात आला होता. यानंतर काही पैसे हर्षिताला पाठवण्यात आले. त्यावर हर्षिताने विश्वास ठेवला. 

हे वाचा - संतापजनक! अपहरणानंतर तरुणीची सातवेळा विक्री, शेवटी आत्महत्येनं केली सुटका

पैसे पाठवल्यानंतर संबंधितांनी हर्षिताला क्यूआर कोडची लिंक पाठवली. त्यानंतर हर्षिताच्या बँक खात्यातून 34 हजार रुपये उचवले. सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलिस विभाग याप्रकरणी चौकशी करत आहेत. 

हे वाचा - माता न तू वैरीणी! अल्लाला खूष करण्यासाठी शिक्षिकेनं दिला 6 वर्षाच्या लेकराचा बळी

अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता इंजिनिअर आहे. दिल्ली आयआयटीमधून 2018 ला तिने बीटेक पूर्ण केलं होतं. दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षिता चर्चेत आली होती. तिने नोकरी सोडून अरविंद केजरीवाल यांचा प्रचार केला होता. तसंच आम आदमी पक्षाच्या प्रचारातही ती पुढे होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi cm kejariwal daughter fraud olx advt