Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Delhi CM Rekha Gupta News : जाणून घ्या, जनसुनावणीवेळ झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नेमकं काय सांगितलं?
Delhi CM Rekha Gupta addressing media after announcing Jansunwai in every constituency following the attack incident.
Delhi CM Rekha Gupta addressing media after announcing Jansunwai in every constituency following the attack incident.esakal
Updated on

Rekha Gupta Delhi politics : जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तर हल्लेखोर व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एक मोठी घोषणा केल्याचे समोर आले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करून दिल्लीतील लोकांना मोठा संदेश दिला. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की आयुष्यात अडथळे येत राहतात, परंतु दिल्लीच्या हितासाठी लढणे कधीही थांबवणार नाही. आता केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच नव्हे तर दिल्लीच्या सर्व विधानसभेत जनसुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 रेखा गुप्ता यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये त्यांची एक जुनी आठवण लिहिली आहे, ज्यामध्ये त्या सांगतात "मी कॉलेजमध्ये असताना, माझ्या वडिलांनी मला गाडी चालवायला दिली. एके दिवशी, एक मोठा अपघात झाला. मी घाबरले आणि मला पुन्हा गाडीला हात लावायला भीती वाटली. मग माझे वडिलांनी सांगितले की आयुष्यात अपघात होत राहतात, तुम्ही भीतीने थांबू नका. तुम्ही रस्त्यावर चालणे थांबवू शकत नाही. आज, मला त्यांची तीच शिकवण पुन्हा आठवत आहे."

Delhi CM Rekha Gupta addressing media after announcing Jansunwai in every constituency following the attack incident.
Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

तर, बुधवारी झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी पुढे लिहिले की, "काल, आणखी एक अपघात झाला, पण मी दिल्लीकरांच्या हितासाठी लढणे कधीही थांबवू शकत नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि माझ्या शरिराचा प्रत्येक कण दिल्लीसाठी समर्पित आहे. या सर्व अनपेक्षित हल्ल्यांना न जुमानता मी कधीही दिल्ली सोडणार नाही. महिलांमध्ये समस्यांशी लढण्याची दुहेरी ताकद आहे. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी असंख्य परीक्षा द्याव्या लागतात. मी देखील तयार आहे. आता सार्वजनिक सुनावणी फक्त माझ्या घरीच नाही तर दिल्लीच्या प्रत्येक विधानसभेत होईल. तुमची मुख्यमंत्री, तुमच्या दारात."

बुधवारी सकाळी जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये हल्ला करण्यात आला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने या हल्ल्याला हत्येचा कट रचल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो सध्या पाच दिवसांसाठी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com