देश
Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...
Rekha Gupta : रेखा गुप्तांना शिवीगाळ करण्यात आली आणि केसांना ओढून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी जनता दरबारादरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
Summary
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारादरम्यान एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला.
आरोपी राजेश भाई खिमजी सकारिया (वय ४१, राजकोट रहिवासी) याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.
भाजप व आप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला असून दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत.
Delhi CM Rekha Gupta attacked during Janata Darbar : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी आठ वाजता एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यानंतर तिथे गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे, पोलिस त्याची चौकशी करत आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.