

Delhi CM Rekha Gupta Registers as Organ Donor
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मरणोत्तर अवयव करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी दिल्ली सरकारच्या अधिकृत व्यासपीठावर स्वतःची ‘दाता’ म्हणून नोंदणी केली असून, त्यांना याबाबतचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. अवयवदान हे उदात्त आणि मानवतावादी कार्य असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनाही अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.