अखेर शाहीनबागेतील ''बुलडोजर'' थांबला, SC नं महापालिकेला फटकारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaheen Bagh Encroachment Drive

अखेर शाहीनबागेतील ''बुलडोजर'' थांबला, SC नं महापालिकेला फटकारलं

नवी दिल्ली : दिल्लीतील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या शाहीनबागेत (Shaheen Bagh Encroachment Drive) आज अतिक्रमण हटाव मोहीम चालविण्यात आली. दिल्ली महापालिकेने शाहीनबागेतील घरांवर बुलडोजर चालवला. मात्र, स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर अखेर बुलडोजर थांबला असून न्यायालयाने देखील दिल्ली महापालिकेला (Delhi Corporation) फटाकारले आहे.

हेही वाचा: 'जहाँगीरपुरी'नंतर 'शाहीनबाग'वरही बुल्डोजर; अतिक्रमणांविरोधात कारवाई

सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार असताना शाहीन बाग येथील अतिक्रमण पाडण्याची मोहीम का सुरू केली? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला विचारला आहे. तसेच याचिकाकेची प्रत सॉलिसिटर जनरलला देण्याचे आदेश याचिकाकर्त्याला दिले आहेत. सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

दिल्ली भाजपाचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी महापौरांना पत्र लिहित रोहिंग्या, बांग्लादेशी आणि समाजविघातक घटकांनी केलेली अतिक्रमणे हटवा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने शाहीन बागेतील अतिक्रमण हटविण्यात सुरुवात केली. दिल्ली महापालिकेचा बुलडोजर शाहीनबागेत पोहोचताच स्थानिकांनी तीव्र निषेध नोंदवला. याठिकाणी आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी धरणे आंदोलन करून कारवाई मार्ग रोखून धरला. त्यानंतर स्थानिकांनी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर अखेर कारवाई थांबविण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुद्दाम हा विध्वंस करण्यात आला, असं आदमी पार्टीचे ओखला आमदार अमानतुल्ला खान म्हणाले. तसेच सार्वजनिक जमिनीवर कोणतेही अवैध अतिक्रमण नाही. तरीही महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Web Title: Delhi Corporation Encroachment Drive Stopped In Shaheen Bagh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiCourt
go to top