

Security personnel conduct intensive checks at Delhi’s Saket, Rohini and Patiala House court complexes after receiving bomb threat emails during the ongoing Red Fort blast investigation.
esakal
Delhi Bomb Blast Threat: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आत्मघाती स्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. यामुळे देशाच्या राजधानीत खळबळ उडाली आहे. दिल्लीतील साकेत कोर्ट, रोहिणी कोर्ट आणि पटियाला हाऊस कोर्ट हे बॉम्बने उडून देण्याची धमकी मिळाली आहे.या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ही धमकी अशा वेळी आली आहे जेव्हा दिल्ली पोलिस आणि केंद्रीय एजन्सी आधीच लाल किल्ला स्फोटाची चौकशी करत आहेत.