दंगलीचा कट रचणारे 'हे' दोघे हिंसाचार प्रकरणातून दोषमुक्त; न्यायालयाचा मोठा निर्णय I Delhi Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Court

Delhi Court : दंगलीचा कट रचणारे 'हे' दोघे हिंसाचार प्रकरणातून दोषमुक्त; न्यायालयाचा मोठा निर्णय

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित प्रकरणात दिल्ली न्यायालयानं आज (शनिवार) शर्जील इमाम आणि आसिफ इक्बाल तन्हा यांना दोषमुक्त केलं.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुल वर्मा यांनी हा आदेश दिला. एफआयआरमध्ये आयपीसी कलम 143, 147, 148, 149, 186, 353, 332, 333, 308, 427, 435, 323, 341, 120 बी आणि 34 एफएफ 3 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले होते.

2020 ईशान्य दिल्ली दंगलीच्या संदर्भात नोंदवलेल्या दुसर्‍या एफआयआरमध्ये इमाम अजूनही कोठडीत आहे. इमाम आणि तन्हा दोघंही स्पेशल सेल प्रकरणात आरोपी आहेत. 2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीमागं मोठा कट असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

टॅग्स :Crime NewsdelhiCourt