Hollywood Movie 'ऑर्फन' सारखीच 'इथं' घडलीये भयानक घटना; मुलानं आईला जिवंत जाळलं अन् बापाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Crime News

आता त्याचं मुलानं आपल्या आईला पेटवून दिलं आणि आता वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देतोय.

Hollywood Movie 'ऑर्फन' सारखीच 'इथं' घडलीये भयानक घटना; मुलानं आईला जिवंत जाळलं अन् बापाला..

बंगळुरू : हॉलिवूड चित्रपट 'ऑर्फन' (Hollywood Movie Orphan) सारखीच एक घटना बंगळुरूमध्ये (Bangalore Karnataka) समोर आलीये. बंगळुरूमधील एका जोडप्यानं एका अनाथ मुलाला दत्तक घेतलं होतं.

आता त्याचं मुलानं आपल्या आईला पेटवून दिलं आणि आता वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देतोय. स्थानिक पोलिसांनी (Karnataka Police) ही माहिती दिलीये. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून उत्तम कुमार असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नीला मूलबाळ नसल्यामुळं त्यांनी एका मुलाला (उत्तम कुमार) दत्तक घेतलं होतं. मात्र, काही दिवसांनी आरोपी उत्तम कुमारनं आई-वडिलांचा अनादर करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा तिरस्कार करु लागला.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी उत्तमनं 2018 मध्येच आपल्या आईला आगीत जिवंत जाळलं होतं, याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती, परंतु सुटका झाल्यानंतर त्यानं वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. घराच्या भाड्यावरुन दोघांमध्ये मोठ वाद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर मुलानं वडिलांवर बंदूक रोखली आणि त्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. सदाशिवनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.