Yasin Bhatkal : दहशतवादी यासीन भटकळसह १० जणांवर आरोप निश्चित! न्यायालयात खटला चालणार

Yasin Bhatkal
Yasin Bhatkal
Updated on

बंदी घातलेली दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याच्यावर न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात आरोप निश्चित केले आहेत. पटियाला हाऊस कोर्टाने यासीन भटकळवर भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचल्याबद्दल आरोप निश्चित केले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी यासीन भटकळ आणि मोहम्मद दानिश अन्सारी याच्यासह ११ जणांना आरोपी म्हणून घोषित केले.

यासीन भटकळ आणि इतर १० जणांविरुद्ध दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी लोकांना 'प्रेरित' करण्यात त्यांच्या सहभागाशी संबंधित प्रकरणात दहशतवादी आरोप निश्चित केले आहेत. भटकळ भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या मोठ्या कटात सामील होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

भटकळ यांच्यावर UAPA कायद्याच्या कलम १८, १८ अ, १८ब, २१, ३८(२), ३९(२), ४०(२) नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर आयपीसी कलम १२१ आणि १२२ अन्वये आरोपही निश्चित करण्यात आले आहेत. ही कलमे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहेत.

Yasin Bhatkal
Chandrakant Patil: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन, म्हणाले...

भटकळ हा दहशतवादी कारवायांसोबत नेपाळमधील माओवाद्यांच्या मदतीने शस्त्रे, दारूगोळा इत्यादी गोळा करण्यासाठी भविष्यातील दहशतवादी कारवायांच्या कटातही सामील होता, असे न्यायालयाने म्हटले होते. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशात भटकळसह ११ जणांवर आरोप निश्चित केले आणि तिघांना दोषमुक्त केले. मंझर इमाम, अरिज खान आणि अब्दुल वाहिद सिद्दीबाप्पा अशी मुक्तता करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

Yasin Bhatkal
Ajit Pawar: मविआच्या सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची! चर्चेवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com