
Umar Khalid Gets Bail : दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला सोमवारी (12 डिसेंबर) करकरडूमा कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. करकरडूमा न्यायालयाने (Karkardooma Court) आरोपी उमर खालिदला एका आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
उमर खालिदला त्याच्या बहिणीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन सशर्त असून न्यायालयाने उमर खालिदला 30 डिसेंबरला आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. उमरला 23 डिसेंबरपासून आठवडाभरासाठी जामीन मिळाला.
तत्पूर्वी शनिवारी (3 डिसेंबर), दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने 2020 ईशान्य दिल्ली दंगलीतील दगडफेकीच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आणखी एक विद्यार्थी नेता खालिद सैफीचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचाला यांनी दगडफेक प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला होता. तथापि, दंगलीमागे मोठा कट रचल्याबद्दल बेकायदेशीर वर्तवणूक (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, ज्यासाठी त्यांना तुरुंगात राहावे लागेल.
खालिद आणि सैफी या दोघांवर 24 फेब्रुवारी 2020 रोजी ईशान्य दिल्लीतील चांद बाग पुलिया भागात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत सहभागी असल्याचा आरोप होता. ते जमावाचा भाग नव्हते, तथापि, त्यांनी या प्रकरणात गुन्हेगारी कट रचल्याचे मानले जाते. भारतीय दंड संहिता कलम 109, 114, 147, 148, 149, 153-अ, 186, 212, 353, 395, 427, 435, 436, 452, 454, 505, 34 ,120-ब आणि इतर अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.