2002 च्या खंडणीप्रकरणी अबू सालेमला सात वर्षांचा तुरुंगवास 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

नवी दिल्ली : दिल्लीचे उद्योगपती अशोक गुप्ता यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपावरून कुख्यात गुंड अबू सालेमला दिल्ली न्यायालयाने आज (गुरुवार) सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अबू सालेमने 2002 मध्ये उद्योगपती गुप्ता यांच्याकडे 'प्रोटेक्शन मनी' म्हणून 5 कोटींची मागणी केली होती. 

गुप्ता यांना 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी अबू सालेमवर 2002 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 26 मेला या प्रकरणात सालेमला दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आज याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने अबू सालेमला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 

Web Title: Delhi court sentences Abu Salem to 7 years in jail in 2002 extortion case

टॅग्स