फरफटत नेल्यानं तरुणीची हाडं तुटली...थरकाप उडवणारा CCTV फुटेज व्हायरल Delhi Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Crime

Delhi Crime: फरफटत नेल्यानं तरुणीची हाडं तुटली...थरकाप उडवणारा CCTV फुटेज व्हायरल

राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला फरफटत नेलं. किती किमी नेलं हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Delhi Crime Girl Drag Case CCTV footage goes viral )

हेही वाचा: Delhi crime :''आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते'',मृत्यू झालेल्या तरुणीचे शब्द ठरले अखेरचे

दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता रस्त्यावर नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला.फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे.

Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजवाला पोलीस स्टेशन (रोहिणी जिल्हा) येथे पहाटे 3 वाजून 24 मिनिटांनी कुतुबगढ भागाकडे जाणाऱ्या कारला एक मृतदेह बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: Delhi crime : नराधमांनी फरफटत नेलेली तरुणी घरात एकटीच कमावणारी होती

पोलिस उपायुक्त हरेंद्र कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा पाय कारच्या एका चाकात अडकला आणि तिला गाडीसोबतच फरफटत नेण्यात आलं. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :crimedelhi