Delhi Crime : घरातील फ्रिजमध्ये आढळला मृतदेह, संशयित नातेवाईकाचा पोलिसांकडून शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news in delhi

याप्रकरणी एका संशयिताची ओळख पटली असून पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.

Delhi Crime : घरातील फ्रिजमध्ये आढळला मृतदेह, संशयित नातेवाईकाचा पोलिसांकडून शोध

ईशान्य दिल्लीतील सीलमपूर येथे शुक्रवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच घरातील फ्रिजमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनगृहात सुरक्षित ठेवला असून झाकीर असे मृताचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Sadabhau Khot : आधी इतिहास तपासा मग बोला, अभद्र युती कुणी केली?; सदाभाऊंनी खडसावलं

याप्रकरणी एका संशयिताची ओळख पटली असून पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर सीलमपूरच्या गौतमपुरी भागात एकटाच राहत होता. त्याचा पत्नीशी वाद सुरू होता. त्यामुळे त्याची पत्नी मुलांना घेऊन वेगळी राहते. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास झाकीरच्या एका नातेवाईकाने पोलिसांना फोन करून तो फोन उचलत नसल्याची माहिती दिली. यानंतर पोलिस ताबडतोब झाकीरच्या घरी पोहोचले असता त्यांना झाकीर घरातील फ्रीजमध्ये मृतावस्थेत आढळला. यानंतर गुन्हे अन्वषेश विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून एका जवळच्या नातेवाईकावर पोलिसांना संशय आहे. झाकीरच्या एका नातेवाईकाने पोलिसांना सांगितले की, झाकीरने स्वतःला त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले होते. झाकीर घरातील फ्रीजमध्ये मृतावस्थेत आढळला असून फ्रीजचा दरवाजा किंचित उघडा होता. त्यातून त्याच्या शरीराचे काही भाग दिसत होते. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणातील आरोप लवकरच सापडेल असे पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा: New Delhi : रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 कर्मचाऱ्यांना अटक

Web Title: Delhi Crime News 50 Years Old Dead Body Found In House Fridge Police Suspect To Relative

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..