Sadabhau Khot : आधी इतिहास तपासा मग बोला, अभद्र युती कुणी केली?; सदाभाऊंनी खडसावलं

या गद्दारांना पात्रतेपेक्षा जास्त देत गेलो, पण त्यांच्यावर लक्ष दिले नाही - आदित्य ठाकरे
sadabhau khot v/s aaditya thackeray
sadabhau khot v/s aaditya thackeray
Summary

या गद्दारांना पात्रतेपेक्षा जास्त देत गेलो, पण त्यांच्यावर लक्ष दिले नाही - आदित्य ठाकरे

मित्रपक्षाने नाही, तर आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसैनिक आणि तमाम जनतेचा त्यांनी विश्वासघात केला. या गद्दारांना पात्रतेपेक्षा जास्त देत गेलो, पण त्यांच्यावर लक्ष दिले नाही, अशी जहरी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर केली आहे. दरम्यान, आता त्यांच्या या टीकेचा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

sadabhau khot v/s aaditya thackeray
New Delhi : रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 कर्मचाऱ्यांना अटक

सदाभाऊ खोत यांनी यांसदर्भात एक ट्वीट करत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला धारेवर धरलं आहे. यात ते म्हणतात, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मिठी मारत तुम्ही पाठीमध्ये खंजीर खूपसला असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. वक्तव्य करण्याआधी इतिहास तपासा आणि मग बोला, 2019च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला पण महाराष्ट्रावर शोककळा आणणारी अभद्र युती कुणी केली?, असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

दरम्यान, सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील जनतेशी येत्या काही दिवसांत ठाकरे या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी एके ठिकाणी बोलताना ठाकरे म्हणाले की, फुटीर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. माणुसकी नसलेले हे सध्याचे राजकारण आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसंवाद यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. आपल्या नेत्यांवर लक्ष ठेवायला हवं होत मात्र विश्वास ठेवला हेच आपलं चुकलं असंही ते म्हणाल होते. बंडखोरांचा हा उठाव नाही तर गद्दारीच आहे, असंही ते म्हणाले होते.

sadabhau khot v/s aaditya thackeray
MH Rain Update : राज्यात पुढील 3-4 दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार, IMD चा अंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com