Father Murder Daughter
ESakal
देश
Crime: संतापजनक! '५० पर्यंत पाढे म्हणून दाखव'! चिमुकलीला जमलं नाही, संतापलेल्या पित्यानं क्रूरपणे मुलीला संपवलं
Father Murder Daughter: फरीदाबादमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांनी त्यांच्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. याचे कारण समोर आले आहे.
दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये शिक्षणाच्या नावाखाली घडलेल्या घटनेने वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला कलंकित केले आहे. सेक्टर ५८ पोलीस स्टेशन परिसरात एका वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीला फक्त ५० पर्यंत पाढे मोजता येत नसल्याने मारहाण करून ठार मारले. ही भयानक घटना २१ जानेवारी रोजी घडली. पोलीस तपासानंतर शुक्रवारी उघडकीस आली.

