दिल्लीत पुन्हा एकदा एक भयानक घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागात राहणाऱ्या २५ वर्षीय साक्षीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिच्या भाड्याच्या खोलीत ही हत्या झाली. हत्येनंतर पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे घटनेची माहिती मिळाली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.