Delhi News : दिल्लीत शुक्रवारी चांगुलपणाचे शिखर संमेलन

'चांगुलपणाची चळवळ' ही काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे.
dr prakash amte and mandakini amte
dr prakash amte and mandakini amtesakal
Summary

'चांगुलपणाची चळवळ' ही काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे.

नवी दिल्ली - चाणक्यपुरीतील CSOI ऑडिटोरियम मध्ये 'चांगुलपणाची शिखर परिषद' होत असून या संमेलनात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना चांगुलपणाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींनाही चांगुलपणाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

'चांगुलपणाची चळवळ' ही काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या जनजागृतीचे कार्यक्रम घेणं, तळागाळात जाऊन प्रत्यक्ष सामाजिक काम करणे, यातूनच. भारतीय संविधानात अपेक्षित असलेलं समाजपरिवर्तनाचं काम होऊ शकेल, ते सर्वानी करावं हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

दिल्लीतील या एकदिवसीय संमेलनातल्या सत्रांमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये चांगुलपणा कसा रुजवता येईल यावर सखोल विचार होणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमधल्या भारताचा लेखाजोखा, सामाजिक न्याय, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, आणि इथून पुढचा २५ वर्षांचा देशाचा प्रवास अशा तीन विषयांवर कार्यक्रमात चर्चा होईल.

शिखर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. अरुण मिश्रा, विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी उपस्थित राहणार आहेत.

मुळे म्हणाले, की या प्रकारची शिखर परिषद ही देशभर विधायक काम करणाऱ्या सगळ्यांना वर्षातून एकदा राष्ट्रीय मंच उपलब्ध करून देते. 'आपल्या चळवळीचा मुख्य उद्देश हा राष्ट्रबांधणीचा असल्यामुळे यानिमित्ताने होणारे विचारमंथन हे राष्ट्राला निश्चितच सकारात्मक मार्गावर नेण्यासाठी साहाय्यभूत होईल.' अशी अपेक्षा मुळे यानी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com