Delhi Elections:'आप' की दिल्ली; केजरीवालांची ऐतिहासिक हॅटट्रिक

delhi election 2020 aam aadmi party arvind kejriwal win confirm afternoon trends
delhi election 2020 aam aadmi party arvind kejriwal win confirm afternoon trends

नवी दिल्ली Delhi Election 2020 : संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपचा एकतर्फी पराभव करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं पुन्हा दिल्लीचं तख्त जिंकलं. आम आदमी पक्षाचा  हा तिसरा विजय असून, केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक करत आहेत. दुसरीकडं भाजपच्या अपेक्षांचा फुगा फुटला असून, काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच्या चर्चेत असणाऱ्या नेत्या अलका लांबा यांनाही चांदणी चौक मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय.

'बिजली, सडक, पानी' याला धरून आम आदमी पक्षानं शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. ही कामे घेऊनच मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीतील मतदारांपुढे गेले होते. त्याला खूप सकारात्मक परिणाम त्यांना दिसला. आज, सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच आम आदमी पक्षाचे बहुतांश सगळे उमेदवार आघाडीवर होते. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. त्यापैकी बहुमतासाठी 36 जागांची गरज असते. पण, दुपारपर्यंत आलेल्या कलानुसार आम आदमी पक्षाला एकूण 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांवर आपला मजबूत आघाडी मिळाली असून, भाजपला उर्वरीत 12 जागांवर चांगली आघाडी मिळाली आहे. मावळत्या सभागृहात आपची सदस्य संख्या 67 होती तर, भाजपचे 3 सदस्य होते. भाजपला जवळपास 9 जागांचा फायदा होत असला तरी, त्यांनी दिल्लीत सत्तांतर करण्याची भाषा केली होती. हे सत्तांतर भाजपला शक्य झालेलं नाही. 

दृष्टीक्षेपात घडामोडी 

  • आम आदमी पक्षाकडून देशभरात जल्लोष 
  • दिल्लीत आपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी 
  • भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात मात्र शुकशुकाट 
  • काँग्रेस प्रवक्ते रणगदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आपचे अभिनंदन
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी दिला पदाचा राजीनामा
  • उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com