Delhi Eelctions: केजरीवालांच्या विजयाचा प्रशांत किशोर पॅटर्न

रविराज गायकवाड
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

आम आदमी पक्षानं दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत धवल यश मिळवलंय. 'अच्छे गुजरे पाँच साल लगे रहो केजरीवाल' या स्लोगननं सुरू झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं कॅम्पेन यशस्वी ठरलंय.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षानं दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत धवल यश मिळवलंय. 'अच्छे गुजरे पाँच साल लगे रहो केजरीवाल' या स्लोगननं सुरू झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं कॅम्पेन यशस्वी ठरलंय. केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्याबरोबरच प्रचाराच्या रणनीतीमध्ये आणखी एक टोकं चाललं होतं. ते म्हणजे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं. जवळपास एक वर्षापूर्वीच प्रशांत किशोर केजरीवाल यांच्यासाठी काम करणार असल्याचं निश्चित झालं होतं. सोशल मीडियाचा खुबीनं वापर, फ्लॅश मॉब, आक्रमक पवित्रा अशा सगळ्या आयुधांचा वापर करत, प्रशांत किशोर यांनी केजरीवाल यांचा विजय निश्चित केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपचा फोकस शाहीनबाग
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा संपूर्ण फोकस शाहीनबाग आंदोलनाच्या भोवती होता. शाहीनबाग आंदोलन कसे पुरस्कृत आहे. तिथं बिर्याणीचं वाटप केलं जातयं. अशा प्रकारचे स्टिंग ऑपरेशन केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात होत. दिल्लीतला मुद्दा असूनही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या विषयावर कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यानी शाहीनबाग आंदोलनावरून हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला. प्रचारा दरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदीही केली होती. 

Delhi Elections : 'आप'ला धक्का, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर

भाजपचे जाळे 
भाजपने अरविंद केजरीवाल यांना हिंदू-मुस्लिम मतांच्या धृवीकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु केजरीवाल त्यात अडकले नाहीत. केजरीवालांनी शाहीनबाग आंदोलनावर भाष्य केले नाही. प्रचारादरम्यान त्यांनी केवळ लाईट, पाणी, वाहतूक, आरोग्य व्यवस्था या विषयांवरच भर दिला. दिल्लीच्या सरकारी शाळांचा बदललेला चेहरा त्यांनी प्रचारात वारंवार मांडला. मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज, पाणी या जमेच्या मद्द्यांवर केजरीवाल यांची बाजू मजबूत होत गेली. 

बजरंगबली आले धावून
केजरीवाल यांनी शाहीनबाग आंदोलनावर भाष्य केले नाही. त्याचेवळी एका टीव्ही इंटव्हूमधील त्यांच्या हनुमान चालिसाँने मात्र निवडणुकीचं चित्र बदलून टाकलं. निवडणुकीत चर्चा हनुमान चालिसाँची सुरू झाली. मतदानाच्या आदल्या दिवशीही केजरीवालांनी जुन्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला. याचा फायदा त्यांना झाला. शाहिनबाग आंदोलनामुळं मतांचं होणारं धार्मिक ध्रुवीकरण टळलं आणि विकासकामांच्या जोरावर मतं केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या पारड्यात पडली. 

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

बिहार रणनिती
प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत महागटबंधन अर्थात राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाचं काम केलं होतं. त्यावेळी भाजपकडून पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर जोर दिला जात होता. पण, प्रशांत किशोर यांच्या रणनितीनुसार महागटबंधनकडून या मुद्द्यांवर कोणतिही प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती. लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार केवळ सामाजिक न्यायाचा अजेंडा घेऊनच पुढे जात राहिले. त्याचा फायदा त्यांना झाला आणि राज्यात भाजप सत्तेपासून दूर राहिला. अर्थात लालू प्रसाद यांदव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर मात्र, नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि सत्तेत कायम राहिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election 2020 raviraj gaikwad writes about arvind kejriwal prashant kishor