Delhi Elections:भाजप मुख्यालयाकडे नेते, कार्यकर्ते फिरकलेच नाही!

टीम ई-सकाळ
Tuesday, 11 February 2020

भाजपनं या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक रणांगणात उतरवली होती. दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडं या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या केवळ तीन जागा होत्या. या निवडणुकीत भाजप 15 ते 17 जागा जिंकेल असं चित्र दिसत आहे. पण, भाजपसाठी हा पराभवच मानला जात आहे. जवळपास 400 नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही भाजपला अतिशय तुरळक यश मिळालयं. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सकाळी 55 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण, भाजप जेमतेम 15 जागा मिळवण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - अच्छे होंग पाँच साल; दिल्ली में तो केजरीवाल!

आणखी वाचा - 'पराजय से हम नही डरते,' भाजपनं पराभव आधीच मान्य केला!

कार्यालयात शुकशुकाट
भाजपनं या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक रणांगणात उतरवली होती. दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडं या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीत लक्ष घातलं होतं. पण, भाजपला अपेक्षित यश आलं नाही. भाजपनं दिल्लीत सत्तांतर करण्याचा अक्षरशः विडा उचलला होता. शाहीनबाग आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत, अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, या गळ्या प्रयत्नांनंतरही भाजपला अतिशय माफक यश मिळालं. त्यामुळं भाजपच्या गोटात निराशा दिसत आहे. एरवी कार्यकर्त्यांनी गजबजणारे भाजपचे मुख्यालय आज शांत शांत होते. मुख्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. कार्यकर्तेच नव्हे तर, नेतेही या कार्यालयाकडं फिरकले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election 2020 bjp headquarters situation after lost against aap