esakal | Delhi Election:अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्जच भरू शकले नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

delhi election 2020 cm arvind kejriwal couldn't reach to file nomination due to crowded rally

दुपारी 12च्या सुमारास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. उघड्या जीपमधून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली होती.

Delhi Election:अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्जच भरू शकले नाही!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला निघालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज, उमेदवारी अर्ज भरू शकले नाही. अर्ज भरण्यासाठी निघालेल्या केजरीवाल यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळं त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. आता केजरीवाल उद्या (मंगळवार, 21 जानेवारी) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले रोड शोमध्ये?
आज, दुपारी 12च्या सुमारास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. उघड्या जीपमधून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली होती. पण, त्यांचे स्वागत करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लाखोंचा समुदाय रस्त्यावर उतरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केजरीवाल समर्थकांना गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचायचे होते. पण, वाल्मिकी मंदिर ते पटेल चौक या मार्गावर निघालेल्या त्यांच्या रॅलीमुळं त्यांना उशीर झाला. रॅलीतील गर्दीमुळं त्यांना पोहोचणे शक्य झाले नाही. अखेर त्यांनी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा - दिल्लीत मिळणार या सुविधा; केजरीवालांची घोषणा

'मी समर्थकांना सोडून जाऊ शकत नाही'
'मला पाठिंबा देण्यासाठी माझे अनेक समर्थक येथे आले आहेत. त्यांना सोडून मी जाऊ शकत नाही. त्यामुळे आता आम्ही उद्या, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी मीडियाशी बोलताना दिली. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच वेळी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसने आव्हान दिले असले तरी, सध्या दिल्लीत आम आदमी पार्टीचीच हवा दिसत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांनी 2013मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. 

Delhi Election 2020 दिल्ली विधानसभा 2020 

loading image