Delhi Elections:दिल्लीत चर्चा प्रियंका गांधींच्या मुलाची!

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

रेहानने आज पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. या निमित्तानं तो प्रकाशझोतात आला आहे.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. दिल्लीतील अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. पण, चर्चेत आले प्रियंका गांधी यांचे चिरंजीव रेहान. रेहानने आज पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. या निमित्तानं तो प्रकाशझोतात आला आहे. मतदान केल्यानंतर मीडियाने त्याला घेराव घातला. त्यावेळी त्याने प्रतिक्रियाही दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'लोकशाही प्रक्रियेचा घटक बनल्याचा आनंद'
रेहान राजीव वद्रा ही व्यक्ती सकाळपासून चर्चेत आहे. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रेहान म्हणाला, 'लोकशाही प्रक्रियेचा घटक बनल्याचा मला आज आनंद होत आहे. प्रत्येकाने त्याचा मतदानाच हक्का बजावलाच पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ मिळायला हवा आणि विद्यार्थ्यांना त्यात सवलत असायला हवी.' रेहान याने लोधी इस्टेटमधील 114 आणि 116 क्रमांकाच्या मतदान केंद्रात आपला मतदानाचा अधिकार बजावला. 

आणखी वाचा - काँग्रेसच्या अलका लांबा, आपच्या कार्यकर्त्यावर गेल्या धावून

आणखी वाचा - निर्भया प्रकरण : '...तर दोषींना फाशी देणे पाप'

रेहान उत्तम नेमबाज
रेहान सध्या डेहराडूनमधील डून स्कूलमध्ये कॉलेजचं शिक्षण घेत असलेला रेहान उत्तम नेमबाज आहे. पण, त्याचा नेम राजकीय कारकिर्दीवर असल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर त्याचं ब्रँडिंग केलं जातंय. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या रोहानच्या पोस्ट आणि चालू घडामोडींवरील भाष्य आयटी टीम कडून करून घेतल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रेहान राजकारणात पाऊल टाकणार का? टाकणार असले तर कधी टाकणार? याविषयी आताच सांगणे मुश्कील असले तरी, त्याची तयारी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election congress leader priyanka gandhi son rehan casts his first vote