esakal | Delhi Elections:अलका लांबा आपच्या कार्यकर्त्यावर गेल्या धावून; मतदान केंद्रावर राडा
sakal

बोलून बातमी शोधा

delhi election congress leader alka lamba slaps aap worker at voting center

चांदनी चौक मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या अलका लांबा आज मतदारसंघातील केंद्रांना भेटी देत होत्या. त्यावेळी मंजु का टिला परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये  बाचाबाची झाली.

Delhi Elections:अलका लांबा आपच्या कार्यकर्त्यावर गेल्या धावून; मतदान केंद्रावर राडा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Delhi Assembly Elections 2020 : दिल्लीतील काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आज, मतदानाच्या दिवशी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हात उगारला. त्या कार्यकर्त्याला अलका लांबा मारणारच होत्या. तोपर्यंत पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मारहाण टळली. संबंधित कार्यकर्त्यानं अलका लांबा यांना त्यांच्या मुलावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अलका लांबा यांनी हात उगारल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चांदनी चौक मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या अलका लांबा आज मतदारसंघातील केंद्रांना भेटी देत होत्या. त्यावेळी मंजु का टिला परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये  बाचाबाची झाली. त्यावेळी आपच्या एका कार्यकर्त्याने अलका लांबा यांना त्यांच्या मुलावरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावेळी अलका लांबा त्या कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेल्या. त्या कार्यकर्त्याला मारणार इतक्यात पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याची माहिती आपचे नेते संजय सिंह यांनी मीडियाशी बोलताना दिली.

आणखी वाचा - 'ज्यांनी काम केलं त्यांनाच लोक निवडून देतील'

आणखी वाचा - दिल्लीत या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोण आहेत अलका लांबा?
अलका लांबा या मूळच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. एकेकाळी काँग्रेसमधील राहुल ब्रिगेडमध्ये एक विश्वासू नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. पण, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश केला. आपच्या तिकिटावर त्या निवडूनही आल्या आणि त्यांनी आपच्या आमदार म्हणून पाच वर्षे कामही केलं. पण, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी रितसर पक्ष प्रवेश केला. आपकडून त्यांनी चांदनी चौक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच मतदारसंघात त्या आता काँग्रेसकडून रिंगणात उतरल्या आहेत. 

Delhi Election 2020