Delhi Elections:दिल्लीत बहुमताचा आकडा किती? कोणाला किती संधी?

टीम ई-सकाळ
Sunday, 9 February 2020

दिल्लीत सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षाच्या बाजूने वातावरण होते. त्यात आता मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही आम आदमी पक्षाच्याच बाजूने कल असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर विविध वाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले. त्यात सगळ्यांनीच आम आदमी पक्षाला पुन्हा संधी असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. जवळपास प्रत्येक एक्झिटपोलमध्ये आम आदमी पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. 

एक्झिट पोलचे अंदाज असे
चॅनेल आम आदमी पक्ष भाजप काँग्रेस
टीव्ही-9 भारतवर्ष 54 15+ 1
टाईम्स नाऊ 47 23+ 0
एबीपी न्यूज सी-व्होटर 56 12+ 2
रिपब्लिक जन की बात 55 15+ 0
इंडिया टीव्ही 44 26+ 0
न्यूज एक्स पोलट्रॅट 56 14+ 0
न्यूज एक्स नेता 55 14+ 1
इंडिया टुडे  63 7+ 0

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुमताचा आकडा किती?
दिल्लीत विधानसभेत 70 जागा आहेत. त्यामुळं सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 36 जागांची गरज असते. हा 36चा जादुई आकडा आम आदमी पार्टी सहज गाठेल, असं चित्र सध्या दिसत आहे. दिल्लीत सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षाच्या बाजूने वातावरण होते. त्यात आता मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही आम आदमी पक्षाच्याच बाजूने कल असल्याचे दिसत आहे. भाजप गेल्या निवडणुकीच्या तुलनेत थोडी प्रगती करेल, असे दिसत असून, काँग्रेसला मात्र फारशी संधी नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने जवळपास 15 वर्षे दिल्लीत सत्ता उपभोगली आहे. पण, या निवडणुकीतही काँग्रेस खाते उघडू शकणार नाही, असे चित्र आहे.

आणखी वाचा - अरविंद केजरीवालांनी कसं केलं होतं पत्नीला प्रपोज?

'आप'ला फायदा कशाचा?
आम आदमी पक्षाने निवडणुकीत आश्वासनांची अक्षरशः खैरात केली आहे. निवडणुकीतपूर्वी महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याची घोषणा केली. तसेच निवडणुकीत तरुण, महिला, ग्रामीण, शहरी अशा प्रत्येक घटकाला खूष करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसत आहे. त्यामुळच एक्झिट पोलमध्ये सगळे कल आम आदमी पक्षाच्या बाजूने दिसत आहेत. एकूण मतदानातील 50 टक्के मतांचा वाटा आम आदमी पक्षाला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात अर्थातच महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election exit poll information marathi aam aadmi party