
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारूण पराभव झाला. मुख्यमंत्री आतिशी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. भाजपने एकहाती सत्ता मिळवत २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. आम आदमी पार्टीच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अण्णा हजारे म्हणाले की, मी नेहमीत सांगितलं की, उमेदवाराचं वागणं, विचार शुद्ध असायला हवं. त्याग असायला हवा, कोणताही डाग नसावा. हे गुण तुम्हाला मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी उपयोगी पडतात.