Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ, तात्काळ सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalGoogle file photo

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जस्टिस मनमोहन यांच्या कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ईडीच्या रिमांड विरोधात त्यांनी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तातडीची सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती.

Arvind Kejriwal
Himachal Pradesh Politics : अखेर 'त्या' ९ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का

आता केजरीवाल यांच्या याचिकेवर होळीच्या सुट्टीनंतर २७ मार्च रोजी कोर्ट सुरु झाल्यानंतर सुनावणी होऊ शकते. सोमवार आणि मंगळवारी हायकोर्टाला सुट्ट्या आहेत.

''केजरीवालांचं प्रेम जनतेसोबतच''

‘‘सत्तेच्या अहंकाराने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. सतत तीन वेळा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सत्ता सोपविली. हा दिल्ली येथील लोकांशी धोका आहे. दिल्लीकरांसोबत ते नेहमीच राहिले. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. आत असो वा बाहेर असो त्यांचे प्रेम तुमच्या सोबत राहणार आहे.'' अशा भावना सुनीता केजरीवाल यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केल्या.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : केजरीवालांना अटक, पुढे काय? सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील का? 'या' नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

भारताकडून जर्मनीचा निषेध

केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य करणे जर्मनीला महागात पडले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत जर्मन दूतावासातील उपप्रमुखांना बोलावून घेत निषेध नोंदविला. जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य हे भारताच्या अंतर्गत घडामोडींमधील हस्तक्षेप असल्याची टीका भारताकडून करण्यात आली. जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य करताना केजरीवाल यांना कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय मदत मिळेल अशी अपेक्षा असल्याचे विधान केले होते. केजरीवालांच्या खटल्यामध्ये लोकशाही नियमांचे पालन होईल अशी अपेक्षाही आम्हाला असल्याचे नमूद केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com