
देशाची राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आरोपीने त्याच्या आईवडिलांची आणि मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली यानंतर तो फरार झाला आहे. ही घटना बुधवारी दक्षिण दिल्लीतील खार्क रिवाडा गावात घडली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे आणि पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.