गाझीपूर डंपिंग यार्डमध्ये आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल

Fire at Ghazipur dumping yard
Fire at Ghazipur dumping yardFire at Ghazipur dumping yard

दिल्लीतील (Delhi) गाझीपूर येथील डम्पिंग यार्डमध्ये सोमवारी (ता. २८) सायंकाळी अचानक आग (Fire) लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

याआधी १ सप्टेंबर २०१७ रोजी गाझीपूर डम्पिंग ग्राऊंडवर (Ghazipur dumping yard) अचानक मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे हजारो टन कचरा रस्त्याच्या कडेला पडला होता. या अपघातामुळे पाच कार कालव्यात पडल्या, तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सुमारे पाच जण जखमीही झाले होते. यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. मृत दोघेही राजबीर कॉलनीतील रहिवासी होते. अपघातानंतर सुमारे दहा दिवस कचरा हटविण्याचे काम सुरू होते.

अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये आणि कचऱ्याच्या डोंगराची उंची कमी करता यावी यासाठी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या धरण विभागाने अनेक योजना आखल्या होत्या. आयआयटी दिल्लीच्या सल्लागारांचीही मदत घेण्यात आली. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. १ सप्टेंबर २०१७ रोजी गाझीपूरमध्ये अपघात झाला तेव्हा लँडफिल साइटची उंची ५९ मीटर होती. सोमवारी गाझीपूर डंपिंग यार्डमध्ये (Ghazipur dumping yard) पुन्हा आग लागली. आग (Fire) नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com