दिल्ली: करोल बागेत भीषण आग; अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या तैनात

ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या ज्वाळा दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
 Delhi Karol Bagh Fire
Delhi Karol Bagh FireSakal

दिल्लीतल्या करोल बाग परिसरातल्या गफर मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. या आगीत एकही मृत्यू किंवा जखमी झालेला नाही.

दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, किंवा कोणालाही इजा झालेली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या एका जवानाला किरकोळ जखम झालेली आहे. अद्याप आग लागल्याचं कारण समोर आलेलं नाही.

गफर मार्केट इथल्या चपलांच्या बाजारात ही आग लागली. सकाळी सव्वाचार वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या ही आग विझवण्यासाठी पाठवण्यात आल्या. आता ही आग नियंत्रणात आली असून या आगीच्या ज्वाळा दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोतल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com