
Delhi Fire: इमारतीचं NOC नाही; मालकांना अटक
दिल्लीतल्या मुंडका परिसरातल्या एका तीन मजली कारखान्याच्या इमारतीला काल भीषण आग लागली. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. हा कारखाना बांधत असताना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केली नसल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा: दिल्ली अग्निकांड: सकाळपर्यंत २७ मृतदेह हाती, प्रशासनाची माहिती
दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्याच्या नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्रासाठी अर्ज कधीच करण्यात आलेला नव्हता आणि तसंच या इमारतीत जे कारखाने आहेत, त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसून ते नियमावलीचं पालन न करता कार्यरत होते.
हेही वाचा: दिल्ली अग्निकांड: दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
या प्रकरणी कारखान्याचे प्रमुख वरुण गोयल आणि सतिश गोयल यांना दिल्ली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Web Title: Delhi Fire Noc Of Building Is Not Available Says Fire Chief
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..