वायुप्रदूषणाबाबत तासात आल्या 5 हजार सूचना

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाने मागील दोन दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली असून, दिल्लीचे पर्यटणमंत्री कपील मिश्रा यांनी वायुप्रदूषण कमी करण्याबाबत नागरिकांकडे सूचना मागितल्या. नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत तासात 5 हजार सूचना सरकारकडे सादर केल्या.

मिश्रा म्हणाले, 'वायुप्रदूषण कमी करण्याबाबत संकेतस्थळावरून नागरिकांकडे सूचना मागविण्यात आल्या होत्या. नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत पहिल्या तासातच 5 हजार सूचना पाठविल्या आहेत. सर्व दिल्लीकर मिळून शहर स्वच्छ करू व चांगल्या वातावरणात एकत्र राहू.'

दरम्यान, दिल्लीतील वायुप्रदूषणाने मागील दोन दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली असून, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (ता. 6) राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला होता. राज्यातील सर्व शाळा पुढील तीन दिवस बंद ठेवल्या जाणार असून, मोठ्या बांधकाम प्रकल्पांनाही ब्रेक लावण्यात आला आहे. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी करण्यासाठी पुन्हा सम-विषम प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. लोकांनी शक्‍य असेल तेथे घरातच काम करावे, अशी सूचनाही सरकारने केली आहे.

Web Title: Delhi Government Gets 5,000 Fight Pollution ideas In 1 Hour