धक्कादायक : गे डेटिंग ऍपच्या जाळ्यात अडकले अधिकारी; ब्लॅकमेलिंगचेही ठरले बळी

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आता पर्यंत 50 बड्या अधिकाऱ्यांची फसवणूक झाली असून, यात बड्या कंपन्यांच्या सीईओ पदावरी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

गुरुग्राम : गे डेटिंग ऍपच्या माध्यमातनं मल्टिनॅशनल कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या माध्यमातून अनेकांची लुबाडणूक झाली असल्याचीही माहिती पुढे आलीय. पण, बदनामीच्या भीतीनं अनेकांनी पोलिसांत तक्रार केली नसल्याचं स्पष्ट झालंय. आता पर्यंत 50 बड्या अधिकाऱ्यांची फसवणूक झाली असून, यात बड्या कंपन्यांच्या सीईओ पदावरी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पोलिस काय सांगतात?
गुरुग्राममधील बादशाहपूर पोलिस ठाण्यातचे पोलिस निरीक्षक मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांचा एक ग्रुप गे डेटिंग ऍपच्या माध्यमातून बायोसेक्शुअल आणि गे अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढत होता. बड्या कंपन्यांच्या मोठ मोठ्या पदांवर काम करणारे हे अधिकारी सह त्यांच्या जाळ्यात येत होते. त्यानंतर डेटिंगच्या बहाण्यानं या अधिकाऱ्यांना एखाद्या कॉफी शॉपमध्ये बोलवलं जायचं. तिथून फिरायला जाण्याच्या बहाण्यानं हायवेवर निर्जन स्थळी नेलं जाययं. तिथं डेटिंग करणाऱ्याचे इतर मित्रही असायचे. त्यांच्या मदतीनं त्या अधिकाऱ्याला लुटलं जायचं. त्याच्याकडचे दागिने, मोबाईल, कॅश लुटली जायची. एवढचं नव्हे तर त्यांचे काही आक्षेपार्ह फोटो काढून पुढं त्यांना ब्लॅकमेलही केलं जायचं. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती मुकेश यांनी सांगितलं. यात या गँगच्या म्होरक्याचाही समावेश आहे.

आणखी वाचा - या उद्योगपतीनं अंबानींनाही मागं टाकलं, घरासाठी उधळले...

आणखी वाचा - केजरीवालांचे यश, भाजपला धडा

इंग्लिशसाठी इंजिनीअरची मदत
आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या म्होरक्यानं सगळ्याची माहिती दिली. एका मित्राकडून या संदर्भात कल्पना मिळाली आणि त्यानंतर एक गँग तयार करण्यात आल्याचं त्यानं सांगितलं. कोणी तक्रार करण्याचं धाडसच करत नसल्यामुळं या गँगला मोकळं रान मिळालं होतं. त्यामुळं यांनी अनेकांना असं लुटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, केवळ एका व्यक्तीनं या संदर्भात तक्रार दाखल करण्याचं धाडस केलंय, अशी माहिती पोलिसांनी दिली. या टोळक्यातील सगळे अशिक्षित आहेत. त्यामुळं बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला जाळ्यात ओढळण्यासाठी इंग्लिशवर चांगली कमांड असणं गरजेचं होतं. त्यासाठी या टोळक्यानं एका इंजिनीअरची मदत घेतली. ऍपवर संपूर्ण प्रोफाईलची माहिती दिली जात नसल्यामुळं बड्या अधिकाऱ्यांना गाठण्यासाठी हे टोळकं अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचं. त्यातून काही अधिकारी त्यांच्या हाताला लागले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi gurugram gay honey trap 50 senior executives robbed