दिल्ली हिंसाचार : अमित शाहांचे आवश्यक कारवाईचे निर्देश

delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action
delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action esakal

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत जहांगीरपुरी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याने दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काही वाहने जमावाने जाळल्याचे वृत्त आहे.

"दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. पण आम्ही पुरेसा फौजफाटा तैनात केला आहे आणि वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, राष्ट्रीय राजधानीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे. ''मी लोकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो,'' असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत, असेही ते म्हणाले.

हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) शनिवारी (ता. १६) निघालेल्या मिरवणुकीत दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये दगडफेक (Stone throwing) झाली. यावेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली.मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.

delhi hanuman jayanti violence amit shah directs delhi police to take necessary action
"PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल

गृहमंत्र्यांनी पोलिस आयुक्त आणि विशेष आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी बोलले आणि त्यांनी जहांगीरपुरी हिंसाचारानंतर आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे निर्देश दिले, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराबद्दल दलाने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना आवश्यक निर्देश दिले आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जहांगीरपुरीला लागून असलेल्या इतर संवेदनशील भागातही अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com