

Summary
वादग्रस्त घर सामायिक असल्याने वेगळे राहणे अव्यवहार्य ठरले.
वृद्ध दांपत्याने सुनेसाठी पर्यायी घर आणि सर्व खर्च देण्याची तयारी दर्शवली.
न्यायालयाने सुनेला ४ आठवड्यांत नवीन फ्लॅट मिळवून २ आठवड्यांत घर रिकामे करण्याचे आदेश दिले.
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी कौटुंबिक वादात वृद्ध पालकांच्या शांततेला प्राधान्य देणारा निर्णय दिला.न्यायालयाने म्हटले आहे की ज्येष्ठांना त्यांच्या स्वतःच्या घरात शांती आणि सन्मानाने राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. कौटुंबिक वादातही कोणीही हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. सुनेला सासऱ्यांच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्देश देणाऱ्या ट्रायल कोर्टाचा आदेश न्यायालयाने कायम ठेवले.