CJP Leaders Saurabh Das, Ashutosh Ranka
esakal
दिलासा मिळवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने नियमांच्या उल्लंघनावरून चांगलेच सुनावलं आहे. तसेच, ‘तुम्ही जेन झी नाहीत,’ अशी टिप्पणीही केली. विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईएम) न्यायालयातील सुनावणीची वाट पाहण्याचा सल्ला देत हायकोर्टाने थेट आपल्याकडे का आलात, असा सवाल उपस्थित केला. न्यायालयाच्या सुनावणीनंतर सीजेपीच्या नेत्यांनी आपली याचिका मागे घेतली आहे.