सोनिया, राहुल गांधी यांना झटका; नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हायकोर्टाकडून नोटीस

Delhi High Court issues notice to Congress leader Sonia Gandhi & Rahul Gandhi for National Herald Case
Delhi High Court issues notice to Congress leader Sonia Gandhi & Rahul Gandhi for National Herald Case

नॅशन हेरॉल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विविध कागदपत्रं आणि साक्षीदारांना बोलवण्यासंबंधीच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता १२ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने स्वामी यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रमुख साक्षीदारांच्या आधारावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाने ११ फेब्रुवारीला म्हटलं होतं की, "या प्रकरणी चौकशी संपल्यानंतर सीआरपीसीच्या कलम २४४ नुसार सुब्रमण्याम स्वामी यांच्यावतीनं दाखल प्रमुख साक्षीदारांच्या अर्जावर विचार करेल" 

सत्र न्यायालयात सीआरपीसी कलम २४४ अंतर्गत दाखल अर्जामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी हायकोर्टाचे रजिस्ट्री अधिकारी, भूमी आणि विकास उपअधिकारी तसेच आयकर विभागाच्या एका उपायुक्तांसह काही साक्षीदारांना समन्स पाठवण्याचं आवाहन केलं होतं. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खासगी गुन्हेगारी तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतर लोकांवर नॅशनल हेरॉल्डकडून फसवणूक आणि बेकायदा उत्पन्न मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. मात्र, गांधींसह सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com