esakal | राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

बापरे ! महाराष्ट्रातील 'या' पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय, काळजी घ्या

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : महाराष्ट्रात नव्याने वाढ होणा-या रुग्णांपेक्षा (corona patients) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक (Corona free patients) होती. मात्र, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची (New Corona Patients) संख्या अधिक नोंदवली आहे. यामुळे सक्रिय रुग्ण (Active Patient) संख्येतदेखील वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या (Health Department) वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या 1 लाख 16 हजार 165 सक्रिय रुग्णांवर उपचार (Treatment) सुरु आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या यादीत राज्यातील काही महत्त्वाचे जिल्हे आहेत. ज्यांची संख्या गेल्या एक महिन्यापासून 10 हजारांवर कायम आहे. ( Corona Active patients too much in Five Districts in Maharashtra)

या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

सर्वात जास्त सक्रिय रुग्णांच्या संख्येत राज्यातील महत्त्वाचे पाच जिल्हे आहेत. ज्यात, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मुंबई हे जिल्हे आघाडीवर आहेत. या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, अजूनही राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असून तिथे चिंतेची परिस्थिती असल्याचे मत राज्य टास्क फोर्सचे सदस्य व्यक्त करतात. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून सक्रिय रुग्णांचा ट्रेंड हा कायम आहे. दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली. त्यानंतर पुन्हा हळूहळू रुग्णसंख्या वाढून सध्या तो आलेख स्थिर असल्याचे दिसते. पण, हा आलेख कधीही वर जाऊ शकतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे, ज्या जिल्ह्यांत सक्रिय रुग्ण जास्त आहेत तिथे अनलॉकची प्रक्रिया हळूहळू करावी असे स्पष्ट मत राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेस येताच आईने दोन वर्षाच्या मुलीसह मारली उडी

11 जून 2021 सक्रिय रुग्णांची संख्या

जिल्हे संख्या

मुंबई - 17, 931

ठाणे - 15,816

पुणे - 20,299

सातारा - 10369

सांगली - 11090

कोल्हापूर - 16947

11 जुलै 2021 सक्रिय रुग्णांची संख्या

जिल्हे संख्या

मुंबई - 11,423

ठाणे - 16,626

पुणे - 19,034

सांगली - 11717

कोल्हापूर - 13157

हेही वाचा: "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

कमी सक्रिय रुग्णांचे जिल्हे

राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी सक्रिय रुग्ण असून इथली संख्या 100 हून खाली आहे. यवतमाळ 22, हिंगोली 81, गोंदिया 82 आणि नंदूरबारमध्ये 99 या चार जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये गेल्या महिन्यात 714 सक्रिय रुग्ण होते जे आता फक्त 22 आहेत. त्यामुळे, काही जिल्ह्यांमध्ये दिलासादायी तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंता आणि काळजीचे वातावरण आहे.

मृत्यूंचे प्रमाण जास्त

कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, अजूनही राज्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी होत नाही. अजूनही डेल्टा आणि कापा या दोन्ही व्हायरसचे व्हेरिएंट आपल्याकडे सापडत आहेत. लोकांचे वर्तन आणि नियम न पाळणे या अशा कारणांमुळे अजूनही नियंत्रण आलेले नाही. दिल्ली, चेन्नई, बंगळुरु यांसारख्या शहरात सध्या 200 ते 300 रुग्ण आढळत आहेत. पण, महाराष्ट्रात रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही.

ही आहेत तीन महत्त्वाची कारणे

लोकांची गैरवर्तणूक

डेल्टा आणि कापा या दोन्ही व्हेरिएंटचे रुग्ण जास्त

लसीकरणाचा कासवगतीने वेग

loading image